श्री शिवाजी एज्यूकेशन सोसायटीचे, श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा, राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका प्रगती गायकवाड हिने स्वतः 100 मास्क तयार करून इंदापूर तालुक्यातील पिंपरी बु. या गावामधील श्रीराम नगर परीसरातील नागरिकांना मास्कचे वाटप देऊन करून कोरोना पासून काळजी घ्या.... घरी राहा, सुरक्षित राहा आपणच आपल्या परिसराची काळजी घेऊ या असे आवाहन प्रगतीने नागरिकांना केले. कोरोना महामारी साठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे विध्यार्थी जे समाजोपयोगी काम करत आहे. ते काम मला भावले आणि आपणही अशाप्रकारे जनजागृतीचे काम केले पाहिजे.असे मत प्रगती गायकवाड हिने व्यक्त केले.
डॉ. प्रकाश पांढरमिसे
रासेयो, कार्यक्रम अधिकारी व विभागीय समन्वयक इंदापूर