कोरना ठरू शकेल का शेतकऱ्यांसाठी इष्टापत्ती?
कोरोनाचा प्रकोप सुरू झाल्यावर सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला. बाजारपेठ बंद राहिल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करताना प्रचंड अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातही सोशल मीडियामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीत भरच पडली. सोशल मीडियाचा वापर करणारे बरेच जण शेतकऱ्यांचीच मुले आहेत, जी आज शासकीय,खाजगी लहान मोठ्या नोकरीला आहेत, त्यांनी प्रथम चिकन खाल्ल्यानंतर कोरोना होतो,ही अफवा वार्यापेक्षा जोरात पसरविली.त्याचा परीणाम पोल्ट्री व्यवसायांवर झाला.कोंबडी कोणी विकत न घेतल्याने कोंबड्या कवडीमोल दराने दराने विकल्या जाऊ लागल्या.नंतर तर पोल्ट्री वाले कोंबड्यांना मोकड्या सोडुन दिल्या. काही पोल्ट्री वाल्यांनी जिवंत कोंबड्या जेसीबीच्या साह्याने खड्डे खणून पुरून टाकल्या. व्हाटस् अप बहद्दार त्यावर जोक तयार करून,मजा घेऊ लागले.पोल्ट्री उद्योग उध्वस्त झाला.या मंडळींना यात आनंद होता.याचा परीणाम असा झाला की, कोंबड्या नष्ट झाल्याने,त्यांचे खाद्य मका ( पोल्ट्री फीड)चे भाव अचानक कोसळले.२४०० रु प्रति क्विंटलचा मका उन्हाळ्यात १२०० रु झाला.व हा परीणाम पुढेही टिकुन राहिल. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले व होणार आहे.कोंबडी खाल्याने कोरोना होतो,ही अफवाच राहीली. व्हाटस् अप बहद्दारांचा आनंद मात्र झाला.
त्यानंतर मुस्लिम समाजाच्या फळे विक्री करतांना कोरोणोग्रस्त थुंक लावतो आहे,अशी क्लिप जोरात चालली.अशा इतरही क्लिप व्हाटस् अपवर जोरात चालल्या.वास्तविक ह्या त तथ्यांश असेल तर त्या शासनाकडे पाठवुन सत्यता पडताळणी करुन कारवाई शासनाकडुन करता आली असती.पण चुकीच्या पध्दतीने त्याचा वापर केला.नंतर काही तज्ज्ञांनी त्याची तपासणी करुन पुर्वीच्या काळाच्या वेगवेगळ्या कारणांसाठी होत्या असे दिसुन आले.परंतु याचा परीणाम फळांच्या बाजारावर झाला..त्यामुळे फळविक्रीवर मोठा परीणाम झाला.याचेही नुकसानीचे परीणाम आज शेतकरी भोगत आहेत. कलिंगड खरबूज यासारखी फळे जास्त दिवस टिकत नाहीत ती शेतातच सोडून द्यावी लागली. दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्थाही फारशी वेगळी नाही कोरोनाच्या निमित्ताने दूध संस्थांनी दूध खरेदी दरात घट मात्र पशुखाद्याच्या किमती वाढलेल्या आहेत.वाहतूक व्यवस्था बंद असल्याचे कारण या दरवाढी पाठीमागे सांगितले रासायनिक खते, औषधेही चढ्या दराने विकली जात आहेत. याबाबत मात्र कोणीही आवाज उठवत नाही. आताही गावागावात प्रवेशबंदी घातली जात आहे.मात्र गावातले गावकरी कुठेही जायला मोकळे.त्यावर बंधन नाही.कोरोंटाईल नागरीक गावात मोकळे फिरतात,व्हाटस् अपवर ज्ञान शिकविणारे टोळक्याने गावात बसतात, फिरतात. बाप शेती काम करतो.व शेतमालाच्या किंमतीची चिंता करतो (त्याची त्यांना कसलीच काळजी नसते).त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही नाही. मात्र भाजीपाला गावात विक्रीला बंदी.वास्तविक गावात जागृतता आणुन भाजीपाला विक्री केला असता तर चालू शकले असते. अशा जागरूकते अभावी भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात आहे.व याचा परीणाम शेतकऱ्यांवरच होत आहे.देवाने ,निसर्गाने,कोरोनाने मारले तर,आपण समजु शकतो.ते आपल्या हातात नाही.पण आपलेच, सुपुत्र शेतीवर शिक्षण घेतलेले,बापालाच मारक ठरत आहेत असे मत अॅड. प्रकाश पाटील यांनी त्यांच्या लेखात व्यक्त केले आहे. काल एक बातमी वाचली.एक शेतकऱी आणि त्याची बायको दोघांनी दिवसभर कोथिंबीर काढली. दुसऱ्या दिवशी त्याने ती विकायला नेली. बाजार बंद असल्या कारणाने त्याला कसेबसे 110 रुपये मिळाले दोघांचा दिवसभरचा रोज त्या शेतकऱ्याच्या हाती किती पैसे शिल्लक राहतील? संचार बंदीच्या काळात व्यापारी मात्र मालामाल झाले.
सोशल मीडिया वर आणखी एक मॅसेज व्हायरल झाला तो म्हणजे शेतकरी तुम्हाला सांभाळण्यासाठी शेतात काम करील तुम्ही निवांतपणे घरात बसा. प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांनीच काम करावं हा कसला व्यवहार झाला? बरं शेतकरी काम करण्यास तयार आहे परंतु त्याचा मोबदला किती मिळतो? .वास्तविक शेतकरी पुत्रांनी त्यांचा सोशल मिडीयाचा वापर, शहरातील त्यांच्या ओळखी,त्यांची हुशारी याचा वापर शेतमाल विक्रीत झाला असता तर, शेतकऱ्यांचा निश्र्चितच फायदा झाला असता.
त्यामुळे आता शेतकऱ्यांनीही बदलले पाहिजे. संचार बंदीच्या काळात बाजार बंद आहेत ही इष्टापत्ती मानून आपला माल घर टू घर पोचवला तर उत्पादक ते थेट ग्राहक अशी शेतमालाची विक्री करता येईल. त्यामुळे व्यापारी आणि दलाल यांची साखळी खंडित करता येईल आणि ग्राहकांनाही कमी पैशात शेतमाल मिळू शकेल. शेतकऱ्यांनाही त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळू शकेल. म्हणून आता शेतकऱ्यांनी स्वतः मार्केटिंगमध्ये उतरले पाहिजे. त्यासाठी शेतकरी समूहाच्या विक्री संस्थांचे जाळे उभारता येऊ शकते. कोणाच्या संकटामुळे क्षेत्रातील बदल अटळ आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनाही आता बदलण्याशिवाय पर्याय नाही. थोडक्यात शेतकऱ्यांना कोणाच्या संकटाचा असाही फायदा करून घेता येईल.तसा तो करून घेतला तरच कोरोना ही शेतकऱ्यांसाठी इष्टापत्ती ठरू शकेल.
प्रा. प्रताप शिद
अर्थशास्त्र विभाग
श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय, बावडा